Posted by: Nitin Mule | जुलै 8, 2008

तुझाच….

अंगावर चार थेंब पडले आणि,
निसर्गाच्या आसवांमध्ये न्हाऊन
पावन झाल्यासारखं वाटलं…

शांतपणे आसवं गाळणारं,
मेघांच्या कुशीत आधार शोधणारं क्षितीज
माझ्याच वेदनांची मैफिल ऐकतंय असं वाटलं…

आशेची छोटीशी पालवी शोधताना
उन्मळून पडलेला वड सापडल्यावर,
तुझा आधार मागणारे माझे हात
कुणीतरी कापून टाकल्यासारखं वाटलं…

तुझाच….
नितीन.

Posted by: Nitin Mule | मे 26, 2008

जादू

लहानांपासून मोठ्यांपर्यंत
जिचे सर्वांना आश्चर्य वाटते,
“अथ” पासून ते “इति” पर्यंत
जी सर्वांना अनाकलनीय असते,
क्षणात जी सगळ्यांना भारते,
तीच खरी जादू असते!

आपल्याला माहित असतं,
जादू म्हणजे हातसफाई,
चित्रविचित्र फिरवित बोटं,
क्षणात होतो चोर सवाई!

मला पण असंच वाटायचं,
पण त्या दिवसापर्यंतच.
मी पण असाच “बनायचो”,
पण त्या  दिवसापर्यंतच.

त्या दिवशी रस्त्यावर
आलं होतं एक दुकान,
आच्छादन जरी तंबूचं,
तरी मांडणी होती फारच छान!

मोठ्याने रडणारं खोटं बाळ,
आणि गायब होणारं अंड.
कोपर्यातले छोटे सैनिक
मध्येच करायचे बंड!

पाहून ते सर्व
मी धरला बाबांचा हात घट्ट,
आणि काढ़ले माझे हत्यार,
“ऐन रस्त्यातला हट्ट”!

बाबा बिचारे कीव येऊन,
मला घेऊन गेले आत.
पण आतला पाहून भव्य पसारा,
आम्ही दोघे पडलो चाट!

कोपर्यातलं ते वाघाचं चित्र
कधी जिवंत होईल शाश्वती नव्हती.
म्हणूनच कदाचित तिकडे पाहण्याची
हिंमत आमची होत नव्हती.

तिथल्या दुकानदाराला काय म्हणावे
तेच मला कळत नाही.
असमान कान आणि हिरवे दोळे असणार्याला
“माणूस” ही म्हणवत नाही!

माझ्या डोळ्यांतलं कुतुहल पाहून,
तो फार आनंदित झाला,
त्याच आनंदात त्याने माझ्या डोक्यातून
“एक रुपया” पण काढ़ला!

“विकत घ्या व दोस्तांना चकित करा”
असं लिहिलेलं एक पार्सल,
त्याने माझ्या हातात ठेवलं.
दुकानातल्या काही जादू
त्यात “ग्यारंटी” सह आहेत,
हे त्याने मला पार्सल उघडून दाखवलं.

जादू त्या सार्या शिकण्यात
माझी मती गुंग झाली,
आणि माझ्या बाबांची नजर
खिशाकडून घड्याळाकडे जाऊ लागली.

पण बाबांची फजिती होऊ नये,
म्हणून त्याने “क्रेडीट कार्ड” स्विकारलं,
आणि माझ्यासारख्या हुशार मुलाचं,
जाई‍जाईपर्यंत कौतुक केलं.

बाहेर आल्यावर सहज मागे वळून पाहिलं,
तर तंबूच्या जागी काहीच नव्हतं.
पण माझ्या हातातलं पार्सल?
ते मात्र जसंच्या तसं होतं!

आता मी त्या वस्तूंसोबत,
खरी खरी जादू करतो.
पण माझ्याशिवाय कुणिच त्यावर
विश्वास ठेवायला तयार नसतो!!

मला आता कळलंय,
खरी जादू अशीच असते.
इतरांना कळो वा ना कळो,
आपल्याला त्याचे सोयरसुतक नसते!!!!

नितीन.

H. G. Wells यांच्या “The magic shop” या कथेवर आधारीत.

Posted by: Nitin Mule | ऑक्टोबर 22, 2007

Silence

Once…
I took silence for a ride…
We watched the Sunset together…
Roamed on the banks of a quiet river…
Let our legs hang,
Out of the railings of the old bridge…
Stared endlessly into the skies…
Untill the twilight made way for night…
And finally…
When we stood up to go home…
I opened my mouth to say “Thank you for this wonderful evening!!!”
And angrily,
Silence went away!!!!!

-Nitin.

(Concept borrowed from a little puzzle in the movie “Life is beautiful.” Words are mine.)

Posted by: Nitin Mule | ऑक्टोबर 11, 2007

A Blank Page…

There’s a blank page in front of you.
What will you do to it?
Paint it with all the bright and shiny colours?
Or draw defining lines to create the caricatures?
Or write the sentences on it to be bonded in a story?
Or construct the lines of words to form a rhythmic poetic verse?

The page is happy to accept anything of all this.
It is blank… unnoticeable.
And any of these things can make the page attractive.
The page is happy even if,
You draw a tiger that looks like a cat…
Or colour a scene that has all colours messed up..
Or write the words that cannot carry any sense…
OR write a story, that’s just like a commentary of cricket…
The page accepts your tries and..
Tries to make you feel proud of your creation…

There’s only one thing that a blank page does not like….
It just hates being a paperball after being used as a tissue
And getting kicked in the direction of a dustbin!!!!

-Nitin.

Posted by: Nitin Mule | सप्टेंबर 3, 2007

छत्रीखालचं बालपण

मुसळधार पावसात
खिडकीसमोर बसून
आठवणींचे कण गोळा करताना
हमखास सापडणारा एक कण….
म्हणजे आपलं ‘छत्रीखालचं’ बालपण….

पावसाळ्यात रोज सकाळी
शाळेत जायची इच्छा नसतानाही
आजोबांची जड काळी छत्री घेऊन
चिखलातून वाट काढ़त जात
छोट्या रंगीबेरंगी छत्र्यांमध्ये मिसळणारं….
आपलं ‘बुजलेलं’ बालपण….

दप्तराच्या ओझ्यासोबत
छत्रीची वेगळी पिशवी वागवणारं,
आणि वर्गाबाहेर ठेवल्यामुळे
वेंधळ्यासारखी छत्री विसरल्यावर
आईचा मार खायला लावणारं….
आपलं ‘भिजलेलं’ बालपण….

खूप पाऊस पडल्याने
शाळेला सुट्टी मिळाली,
तर लपाछपी खेळताना
तीच काळी छत्री उघडून
त्यामागे बिनधास्त लपणारं….
आपलं ‘खट्याळ’ बालपण….

नितीन.

Posted by: Nitin Mule | जुलै 5, 2007

Innocence

When ‘Innocence’ is
a new born kid,
It’s termed as ‘childhood’…

As ‘Innocence’ grows in age
and without becoming ‘Intelligence’,
still remains the same,
It’s termed as ‘Ignorance’…

If ‘Innocence’ still remains
In a day to day life of
a fully grown up,
It’s termed as an ‘Idiot’…

- Nitin

All Thanks to – My friends Prajakta Deo n Ketaki Akade.
(For reminding me my own forgotten words… please keep doing this!!!)

Posted by: Nitin Mule | मे 22, 2007

ऊन आणि पाऊस

रणरणतं ऊन
बरंच काही करू शकतं….
नेहमी खळाळणार्या
गावच्या नदीला आटवू शकतं…
उजाड पायवाटेवर चालणार्या
थकलेल्या अनवाणी पायांना
सावलीसाठी भटकायला लावू शकतं…
दोनशे वर्षं जगलेल्या
निष्पर्ण खोडांना
उभ्या उभ्या जाळू शकतं…
पण इवल्याशा डोळ्यांत
पाऊस पडायला लागला,
तर हेच रणरणतं ऊन
पूर्णपणे हतबल होऊन जातं…

गरजणारा, बरसणारा पाऊसही
बरंच काही करू शकतो…
ओसाड मातीतही
अंकूर फुलवू शकतो…
काळ्या दगडांच्या उंच भिंती
झर्यांनी सजवू शकतो…
प्रेमाने उभी असणारी घरं
निर्दयपणे वादळात
वाहून नेऊ शकतो…
काहीतरी मिळवण्यासाठी
घराबाहेर पडलेले पाय
चिखलात रुतवू शकतो आणि
त्याच चिखलात,
बालगोपाळांना खेळवूही शकतो…
पण एखादं कोरडं मन
टिचभरही भिजवण्यात
हाच गरजणारा पाऊस,
नेहमी अपयशी ठरतो…

- नितीन.

Posted by: Nitin Mule | मे 12, 2007

गोची

पावसाचा आनंद घ्यायला
पावसात भिजायची गरज नसते….

सुंदर फूल प्रत्येक वेळी
स्वतःसाठी तोडायची गरज नसते….

कुणी आपली काळजी करतं
हे माहित असताना
प्रत्येक वेळी ते त्याच्याकडून
वदवून घेण्याची गरज नसते…

पण आपण आयुष्यात प्रत्येक गोष्ट
केवळ गरज म्हणून नाही करत….

आणि यातच सगळी गोची असते !!!

‍-‍नितीन.

Posted by: Nitin Mule | ऑक्टोबर 27, 2006

पाचोळी

कालचे कानांत घुमणारे शब्द
आणि उद्याचे भास झाल्यासारखे,
ऐकू येणारे बोल…
यांच्यामधून वाहणारी सरीता,

म्हणजे आजची कविता !!

नितीन.

Posted by: Nitin Mule | ऑक्टोबर 27, 2006

हल्ली….

चार भिंतीही ऐकतात हल्ली
कान लावून तुमचं भांडण….
खिडक्या दरवाजेही कुरकुरतात
अनुभवून घरातलं कोरडेपण….

हल्लीच्या विनाकारण उंचावलेल्या
इमारतींचंही असंच झालंय….
उभ्या काय अन् पडक्या काय,
सारं मातीलाच मिळालंय !

नितीन.

जरा जुन्या पोस्ट्स »

प्रवर्ग