मोकळा वेळ असताना,
गच्चीवर येऊन बसावं..
कुणीही बघत नसतं,
स्वतःशी कितीही हसावं !
या उंच जागी बसून,
खाली तुच्छतेने बघावं..
पक्ष्यांकडे बघून मात्र,
परत निराश व्हावं !
जवळच्या आंब्याच्या शेंड्याला
प्रेमाने आलिंगन द्यावं..
नजरेनेच समोरच्या रस्त्याच्या
अंतापर्यंत जावं !
हवं तितकं नाचावं,
हवं तितकं बागडावं..
पण हे सारे खेळ खेळण्यासाठी
खालचं घर मात्र “आपलं” असावं !
नितीन.


