समुद्रातल्या लाटांच्या भिंतींसारखीच
नभातल्या गडद मेघांच्या "गाद्यां"नाही
आली होती प्रचंड भरती….
आज बहुदा पावसाच्या मनात
रोजची नाजूक रिमझिम नव्हती….
कुणी बेत केले होते भेटण्याचे
कुणी जाणार होतं सुखरूप घरी….
कुणी आनंदाने झेलणार होतं
सुखावणार्या नाजूक सरी….
कुणी घरी जाऊन आईला
सांगणार होतं सार्या गमती….
पण मनात "तूफान" घेऊन येणार्या पावसाला
आज कशाचीच पर्वा नाव्हती….
सारे नभच बरसले
आणि होतेनव्हते वाहून नेले….
जगण्याची जिद्द फक्त राहिली
आणि मदतीचे "आपले" हात पुढ़े आले….
जे वाचले त्यांच्या मते,
पावसाने त्यांना ही शिक्षा दिली होती….
मित्रांनो खरी गोष्ट एवढ़ीच होती,
कधी कधी शेतकर्यांची
शेते खाणार्या पावसाला
आज माणसांची भूक लागली होती….
नितीन.


