एक दिवस मला बैठक मारायची आहे,
थेट काळजाला भिडणारी एक गझल लिहायची आहे !
आधी शब्दच सुचले नव्हते कधी मला,
आता वाक्यांना वाट मोकळी करायची आहे !
गझलेत दर्द आणणारे घाव सोसले नव्हते कधी,
आता मनाच्या फुग्याला फक्त एक सुई टोचायची आहे !
असंख्य पुस्तके पडली आहेत समोर,
तरी स्वतःच्या वेगळेपणाची स्वतःलाच खात्री द्यायची आहे !
जन्मात गाण्याचा यत्नही केला नाही,
आता ही माझीच ओळ खुशीत आळवायची आहे….
थेट काळजाला भिडणारी एक गझल लिहायची आहे !
नितीन.
निःशब्द प्रवास खूप झाला,
अश्रूंनी गाठलेली मजल लिहायची आहे….
युगायुगांचे मौन सोडून
थेट काळजाला भिडणारी गझल लिहायची आहे!!
अपूर्व.



ni:shabda pravas khoop zala
ashrunni gathleli majal lihayachi ahe.
yugayuganche maun sodun
thet kalajala bhidnari gazhal lihayachi ahe.
By: Apoorv Pathak on जानेवारी 5, 2007
at 5:12 pm