
Konay ????
कोणाय ?????
ह्या फोटोमधल्या महाशयांना तुम्ही ओळखता का ?
हे पुणेकर आहेत.
अख्ख्या पुण्यात कुठे नाही सापडले, तरी तळजाई वर नक्की सापडतील.
या महाशयांना फुलापानांचा प्रचंड नाद ! नेहमी त्यांच्यामध्येच गर्क…
लोक बिचारे सुंदर हिरव्या पानांचा फोटो काढ़ायला येतात…
तर उगाच आवाजात झोपेतून उठल्यावर येतो तसा तुसडेपणा आणून, “कोणाय ?????” असं विचारायला फोटोत डोकावतात… या वाक्याला पु. ल. “टच” आहे… जमल्यास हसा…
आम्ही बिचारे शिकाऊ फोटोग्राफर… असं अचानक कुणी आमच्या फोटोत डोकावलं तर आम्ही गडबडून जातो… काय करावं सुचत नाही… शेवटी मनाचा हिय्या करून.. म्हणजे एक्झ्याक्टली काय करून ते नाही माहित… पण तसं करून, काढ़तो एकदाचा फोटो… आता हे महाशय शांत दिसत असले तरो कधी फडफडफड करून अंगावर येतील याचा काही नेम ?
आम्ही आपलं फोटो काढ़तो आणि तळजाईच्या थंड हवेतही फुटलेला घाम टिपतो…
नितीन…

jagat bhaari!
Bhhhhaari!!! to kida kharach ragane pahtoy asa vatatay..
kidyatla puneripana kalayla pan tuzyasarkhach.navkha ka hoina punekarach hava!!!!!!