तोच सूर्य प्रकाशणारा
तेच वारे वाहणारे…
फक्त एका थेंबासाठी
दोन डोळे वर पाहणारे…
उन्हाने जणु आता सार्या
जमिनीत पेटले निखारे…
विझवण्या मी आग तिची
शोधतो वरुणाचे इशारे…
नितीन.
तोच सूर्य प्रकाशणारा
तेच वारे वाहणारे…
फक्त एका थेंबासाठी
दोन डोळे वर पाहणारे…
उन्हाने जणु आता सार्या
जमिनीत पेटले निखारे…
विझवण्या मी आग तिची
शोधतो वरुणाचे इशारे…
नितीन.
Posted in माझ्या कविता
रोज सकाळी पारीजात
फुलांनी सजवायचा माझं मन….
काटेरी पण मवाळ निवडूंग
घालायचा माझ्या भावनांना कुंपण….
दुडूदुडू धावणारे मऊमऊ पाय
रोज खेळायचे माझ्या अंगावर….
छोट्याशा चेंडूमागे पळणारे ते छोटे पाय
नेहमी तसेच राहिले असते तर…..
अनुभवताना स्वर्गिय सुगंध,
मी स्विकारली कोमेजली फुलं….
वाळलेल्या पानांना आणि तुटल्या पाकळ्यांना
माझं घर होतं नेहमीच खुलं….
एक दिवस हे सर्व संपलं,
आणि वाढ़लं फक्त निरूपयोगी गवत….
ओल्या आठवणींचीही आता
फक्त वाळलेलीच सोबत….
नितीन.
Posted in माझ्या कविता
रचताना पत्त्यांचा बंगला
हवाही थांबून पाहत राहते;
एक एक पान भिंतीपाशी
विट बनून उभे राहते !
तंबूवजा त्रिकोणी खोल्या
एकावर एक चढ़त राहतात;
कधी सावध तर कधी बेसावध
सारखी पडझड होत राहते !
मजल्यांवर चढ़ताना मजले
पाने कमी होत जातात;
शेवटची पत्त्यांची जोडी
छताशिवायच संसार थाटते !
बंगल्यासमोरच्या अंगणात
भतुकलीचा रंगतो खेळ;
आणि बंगल्याची प्रत्यक भिंत
त्या खेळाची गोडी चाखत राहते !
अचानक छोटीशी झुळूक
बंगल्याचा थरकाप उडवते;
आज कोसळताना उद्याची उमेद मात्र
उंचच उंच जात राहते !
नितीन.
Posted in माझ्या कविता
Hope flies in the sky!
Maybe that is why Optimists
Always look up!
Hope never dies!
Maybe that is why Optimists
Never give up!
Hope always tests positive!
Maybe that is why Optimists
Do no goof-up!
Hope rejuvenates!
Maybe that is why Optimists
Prefer Hope over a Coffee cup!
I hope to be an Optimist one day!!!
NitiN.
Posted in My own Poetic Creations
वारा झाडांच्या फांद्यांशी
कानगोष्टी करत असतो…
तळ्याचं पाणी सुस्तावल्याने
हलायलाही तयार नसतं…
आकाशही निवांतपणे
तळ्यात आपलंच रुपडं
न्याहाळत असतं…
पण मला मात्र
तेच प्रतिबिंब मधोमध कापत,
पल्याड जाण्याची घाई झालेली असते…
सर्वांच्या मनाविरूद्ध !!!!
नितीन.
Posted in माझ्या कविता
एक दिवस मला बैठक मारायची आहे,
थेट काळजाला भिडणारी एक गझल लिहायची आहे !
आधी शब्दच सुचले नव्हते कधी मला,
आता वाक्यांना वाट मोकळी करायची आहे !
गझलेत दर्द आणणारे घाव सोसले नव्हते कधी,
आता मनाच्या फुग्याला फक्त एक सुई टोचायची आहे !
असंख्य पुस्तके पडली आहेत समोर,
तरी स्वतःच्या वेगळेपणाची स्वतःलाच खात्री द्यायची आहे !
जन्मात गाण्याचा यत्नही केला नाही,
आता ही माझीच ओळ खुशीत आळवायची आहे….
थेट काळजाला भिडणारी एक गझल लिहायची आहे !
नितीन.
निःशब्द प्रवास खूप झाला,
अश्रूंनी गाठलेली मजल लिहायची आहे….
युगायुगांचे मौन सोडून
थेट काळजाला भिडणारी गझल लिहायची आहे!!
अपूर्व.
Posted in माझ्या कविता
कुणाचं खळाळून “हसणं”
सतत ऐकावंसं वाटतं….
कुणाचं सोबत “असणं”
सतत अनुभवावंसं वाटतं….
आपण बांधलेल्या
आशेच्या हिंदोळ्यावर,
कुणाचं तरी नकळत येऊन “बसणं”
हे एवढ़ंसं स्वप्न एकदा तरी
खरं व्हावंसं वाटतं !
नितीन.
Posted in माझ्या कविता
मावळत्या सूर्यासमवेत क्षितीजापार
निघून गेलं तिला भेटवणारं गलबत….
ओल्या आठवणींचीही आता
फक्त वाळलेलीच सोबत….
नितीन.
Posted in माझ्या कविता
I just love this road,
Thogh it has cracks and potholes….
But it has always taken me
nearer to my goals…
The journey on it Is never tiresome…
As the roadside “Shadows”
Are ready to welcome!
It has shown me newer world
And taught me to survive…
But most important -
Whenever I felt,
It has taken me home…
- Nitin.
Posted in My own Poetic Creations
समुद्रातल्या लाटांच्या भिंतींसारखीच
नभातल्या गडद मेघांच्या "गाद्यां"नाही
आली होती प्रचंड भरती….
आज बहुदा पावसाच्या मनात
रोजची नाजूक रिमझिम नव्हती….
कुणी बेत केले होते भेटण्याचे
कुणी जाणार होतं सुखरूप घरी….
कुणी आनंदाने झेलणार होतं
सुखावणार्या नाजूक सरी….
कुणी घरी जाऊन आईला
सांगणार होतं सार्या गमती….
पण मनात "तूफान" घेऊन येणार्या पावसाला
आज कशाचीच पर्वा नाव्हती….
सारे नभच बरसले
आणि होतेनव्हते वाहून नेले….
जगण्याची जिद्द फक्त राहिली
आणि मदतीचे "आपले" हात पुढ़े आले….
जे वाचले त्यांच्या मते,
पावसाने त्यांना ही शिक्षा दिली होती….
मित्रांनो खरी गोष्ट एवढ़ीच होती,
कधी कधी शेतकर्यांची
शेते खाणार्या पावसाला
आज माणसांची भूक लागली होती….
नितीन.
Posted in माझ्या कविता
« Newer Posts - जरा जुन्या पोस्ट्स »