छत्रीखालचं बालपण


मुसळधार पावसात
खिडकीसमोर बसून
आठवणींचे कण गोळा करताना
हमखास सापडणारा एक कण….
म्हणजे आपलं ‘छत्रीखालचं’ बालपण….

पावसाळ्यात रोज सकाळी
शाळेत जायची इच्छा नसतानाही
आजोबांची जड काळी छत्री घेऊन
चिखलातून वाट काढ़त जात
छोट्या रंगीबेरंगी छत्र्यांमध्ये मिसळणारं….
आपलं ‘बुजलेलं’ बालपण….

दप्तराच्या ओझ्यासोबत
छत्रीची वेगळी पिशवी वागवणारं,
आणि वर्गाबाहेर ठेवल्यामुळे
वेंधळ्यासारखी छत्री विसरल्यावर
आईचा मार खायला लावणारं….
आपलं ‘भिजलेलं’ बालपण….

खूप पाऊस पडल्याने
शाळेला सुट्टी मिळाली,
तर लपाछपी खेळताना
तीच काळी छत्री उघडून
त्यामागे बिनधास्त लपणारं….
आपलं ‘खट्याळ’ बालपण….

नितीन.

3 comments on “छत्रीखालचं बालपण”

  1. जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
    असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
    की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
    एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर

  2. फारच सुंदर.
    प्राथमिक शाळेतले दिवस झर्रकन्‍ सरकून गेले डोळ्यासमोरून…


यावर आपले मत नोंदवा